loader
Breaking News
Breaking News
Foto

रावढळ हायस्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा उत्साहात

चिंभावे (रघुनाथ भागवत) - आषाढी एकादशी निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल, रावढळ येथे वारकरी परंपरेचे जतन आणि विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्यांची रुजवण करण्याच्या उद्देशाने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंग, वीणा आणि भगव्या पताका हातात घेऊन “ज्ञानोबा-तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" अशा गजरात दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मुख्याध्यापक सागळे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दवंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कळसाईत यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg