loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवडे नं. 8 शाळेत आषाढी एकादशी वारी उत्साहात संपन्न

तळवडे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे नंबर आठ येथे आषाढी एकादशीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेचे सादरीकरण केले. शाळेच्या परिसरात ज्ञानोबा–तुकारामच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अभंग, भजन तसेच वारकरी संप्रदायाची माहिती सादर केली. आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच वारकरी परंपरेतील भक्ती, शिस्त, समता आणि सेवाभाव या मूल्यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म या विषयी आदर व जिव्हाळा निर्माण झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg