नाणीज (वार्ताहर) : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून मिऱ्या-नागपूर महामार्गावरील पाली ते साखरपा या सुमारे ३० किलोमीटरच्या परिसरात रविवारी एक भव्य आणि प्रेरणादायी सामूहिक वृक्षारोपण अभियान अत्यंत उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक अभियानाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते श्रीक्षेत्र नाणीज येथे वृक्षारोपण करून करण्यात आला.
या सामूहिक वृक्षारोपण अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाप्रमुख महेश म्हाप, जि.प. समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, जि.प. कृषी सभापती महेश नाटेकर, सुदेश मयेकर, शिवसेना विभागप्रमुख सचिन सावंत, पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील, पंचायत समिती सदस्या डॉ. पद्मजा कांबळे, ग्रा.प. नाणीज प्रशासक विनायक शिवगण, माजी सरपंच दत्ताराम शिवगण, संध्या गुरव यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, "जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी माझ्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे." महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तब्बल ३० किलोमीटर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी अत्यंत मोलाचे आणि दूरगामी कार्य हाती घेतले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. हा उपक्रम संपूर्ण समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असून, भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
वृक्षारोपण शुभारंभ झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत आणि जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी पाली ते साखरपा परिसરાची प्रत्यक्ष पाहणी केली. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, महामार्गालगत प्रत्येक भक्त स्वतः लागवड केलेल्या वृक्षाजवळ आदराने उभा राहिला होता. बरोबर दुपारी ३.३० वाजता हजारो भक्तांनी एकाच वेळी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा एक प्रभावी व संदेश देणारा संदेश संपूर्ण समाजात पोहोचविला.जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेतून हाती घेण्यात आलेल्या "प्रत्येक भक्त एक वृक्ष" या उपक्रमांतर्गत ५ जुलै ते १९ जुलै या कालावधीत देशभरात तब्बल ६ लाख १८ हजारांहून अधिक वृक्षांची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. पाली ते साखरपा दरम्यान राबविण्यात आलेले हे सामूहिक वृक्षारोपण अभियान म्हणजे निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे व दुर्गामी पाऊल मानले जात आहे.










































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.