loader
Breaking News
Breaking News
Foto

मडुरा व्हीएननाबरमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) - व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, मडूरा येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. ही दिंडी शाळेपासून मडूरा तिठा मार्गे मारुती मंदिरापर्यंत नेण्यात आली. मारुती मंदिरात विद्यार्थ्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींची पाद्यपूजा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य, संतांच्या जीवनावरील गोष्टी, तसेच अभंगांचे सुमधुर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमानंतर देवस्थान कमिटी आणि मारुती मंदिर मित्रमंडळ यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या प्रसंगी शाळा समिती सदस्य सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर, प्रवीण परब, विष्णू सावंत, स्थानिक समितीचे अध्यक्ष भिकाजी धुरी,पीटीए उपाध्यक्षा श्रावणी परब, पालक तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg