loader
Breaking News
Breaking News
Foto

विटेवरी उभा भक्तांचा कैवारी, श्री देव वेतोबा दिसे पांडुरंग हरी, आरवलीत आषाढी एकादशी निमित्त फुलला भक्तीचा महासागर

आरवली - आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आरवलीचे आराध्य दैवत श्री देव वेतोबा आज विठ्ठलाच्या मोहक रूपात भाविकांना दर्शन देत आहेत. "विटेवरी उभा भक्तांचा कैवारी, श्री देव वेतोबा दिसे पांडुरंग हरी" या भावनेचा प्रत्यय आज मंदिर परिसरात येत असून, भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. सध्या आरवली येथल श्री वेतोबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, दररोज श्री देव वेतोबा यांना विविध आकर्षक आणि पारंपरिक स्वरूपात सजविण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने साकारलेल्या विठ्ठलरूपाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. श्री देव वेतोबांच्या विठ्ठलरूपाचे दर्शन घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विविध भागांतून हजारो भाविक आरवली येथे दाखल होत आहेत. अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान दररोज वेगवेगळ्या दिव्य रूपात श्री देव वेतोबा भक्तांना दर्शन देत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. मंदिर समितीने दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक व्यवस्था केली असून, भाविक मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री देव वेतोबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg