loader
Breaking News
Breaking News
Foto

नीट परिक्षा रद्द झाल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्या गुहागर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली सभा

वरवेली (गणेश किर्वे) - दिल्ली येथील जंतर-मंतरवर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातील मागण्यांना सरकारने मान्यता दिल्यानंतर या संघर्ष दरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या लढ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही गुहागरकर या बॅनरखाली गुहागरमधील सर्व विद्यार्थी, पालक, नागरिक व सामाजिक संघटनांच्या वतीने एकत्रित श्रद्धांजली कार्यक्रम सोमवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाचा नसून विद्येचा प्रती संवेदना व्यक्त करण्याचा त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आणि गुहागर एकजूट ठामपणे मांडण्याचा असल्याचे शृंगारतळी येथील भवानी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, नामवंत वकील संकेत साळवी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत, उपसरपंच असीम साल्हे, अमिष कदम, सुदेश हडकर आदी मान्यवरांनी ही माहिती दिली. तसेच या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी सर्व नागरिक विद्यार्थी पालक व संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट, आपली संवेदना, आपली जबाबदारी, हाच करा गुहागरचा अभिमान असल्याचे दाखवून द्यावे, असेही स्पष्ट केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी सांगितले की, संविधानाची ताकद काय आहे ते विद्यार्थ्यांनी या लढ्यातून दाखवून दिले आहे. संविधानापुढे कोणीही श्रेष्ठ किंवा मोठा नाही, हे या लढ्यातून संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी सांगितले की, दिल्ली येथे झालेल्या लढ्यासाठी स्वतः विद्यार्थी हा रस्त्यावरती उतरला होता त्याला कोणीही बोलवलं नव्हतं, सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याने विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा तसेच लढ्याचा विजय आहे, आम्ही गुहागरकर या संघटनेच्या माध्यमातून गुहागर तालुक्यामध्ये एक लोक चळवळ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यावेळी वकील संकेत साळवी यांनी सांगितले की, सरकारने विद्यार्थ्यांच्या तिन्ही मागण्या मान्य केले असल्याने सोमवारी होणारा मोर्चा आम्ही स्थगित करत आहोत, तसेच या दिवशी गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या लढ्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थी पालक व सामाजिक संघटनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg