loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर रेल्वे स्थानकात एसटी बसच्या बॅटरी कक्षात मोठा तांत्रिक स्फोट; कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने प्रवासी भयभीत

शास्त्रीपूल /वहाब दळवी : दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराचा आणखी एक खळबळजनक नमुना संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास संगमेश्वर स्थानकात उभ्या असलेल्या एका एसटी बसच्या बॅटरी कक्षातून बॉम्बस्फोट व्हावा असा कानठळ्या बसवणारा मोठा आवाज होऊन अचानक तांत्रिक बिघाडाचा स्फोट झाला. या अचानक झालेल्या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली आणि भीतीचे सावट पसरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, देवरुख डेपोची देवरुख ते संगमेश्वर रेल्वे स्थानक ही एसटी बस (गाडी क्रमांक MH 14 LX 7142) दिवा-रत्नागिरी पॅसेंजरने येणाऱ्या प्रवाशांना नेण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात उभी होती. बाहेरून चकचकीत आणि अगदी टकाटक नवीन दिसणाऱ्या या बसकडे पाहून प्रवाशांच्या मनात शंकेची साधी पालही चुकचुकली नव्हती, सर्वजण अगदी निर्धास्तपणे रेल्वेची वाट पाहत उभे होते. मात्र मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास सर्वत्र शांतता असताना अचानक एका भयंकर आवाजाने परिसर हादरून गेला. सुरुवातीला हा आवाज कशाचा होता आणि कुठून आला हे कोणालाच समजले नाही. हा बॉम्बस्फोट तर नाही ना? या भीतीने प्रवाशांची तुफान धांदल उडाली आणि स्थानकातील लोकांची चांगलीच गाळण उडाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg