loader
Breaking News
Breaking News
Foto

​इन्सुली शाळा क्र. २ च्या मोडकळीस आलेल्या छताची सीईओ खेबूडकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - इन्सुली जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ ची इमारत आणि छप्पर अत्यंत मोडकळीस आले असून विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबूडकर यांचे लक्ष वेधले होते. या तक्रारीची दखल घेत सीईओ खेबूडकर यांनी आज प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​पाहणीदरम्यान छताची दुरवस्था पाहून सीईओ खेबूडकर यांनी तातडीने निर्देश दिले की, "मोडकळीस आलेल्या वर्गखोलीत मुलांना कोणत्याही परिस्थितीत बसवू नका. या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तत्काळ सादर करा, शासनस्तरावरून यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला जाईल." ​शाळेसोबतच परिसरातील अंगणवाडीचीही पाहणी करण्यात आली. तेथील फरशी तुटून वर आल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन अंगणवाडीत नवीन फरशी बसवण्याचा प्रस्ताव तयार करून काम तात्काळ पूर्ण करून घ्यावे, असे स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले.

टाइम्स स्पेशल

​या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, प्रशासक सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच केंद्रप्रमुख उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg