loader
Breaking News
Breaking News
Foto

आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, पन्हळी येथे भक्तिमय दिंडी सोहळा

रत्नागिरी (जमीर खलफे) - आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, पन्हळी येथे विद्यार्थ्यांचा पारंपरिक दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून हातात टाळ-मृदंग आणि विठ्ठल-रुक्मिणींच्या प्रतिमेसह दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. "ज्ञानोबा-तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय, भक्ती, संस्कार, शिस्त आणि सामाजिक एकतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होऊन भारतीय परंपरेचे जतन करण्याची प्रेरणा मिळते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंपाकी, मदतनीस, पालक व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा दिंडी सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा प्रेरणादायी आणि भक्तिमय ठरला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg