loader
Breaking News
Breaking News
Foto

विठ्ठलमय झाली दापोली मॉडेल स्कूल फणसू शाळा, मोठ्या उत्साहात साजरी झाली आषाढी एकादशी

​फणसू, दापोली (सागर गोवळे) : ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि विठूनामाच्या गजरात दापोली मॉडेल स्कूल फणसू शाळेत आषाढी एकादशी अत्यंत चैतन्यमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सणानिमित्त चिमुरड्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक रूपांनी संपूर्ण परिसर भक्तीमय केला. शाळेतील लहान मुला-मुलींनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करत उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आणि हातात भगव्या पताka घेत सुंदर दिंडी काढली. वारकरी संतांच्या वेशभूषेत सजलेली बालगोपाळांची जोडी आणि मुलींचा पारंपरिक नऊवारी साड्यांमधील पेहराव लक्षवेधी ठरला. शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणिवांसोबतच एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.​"आषाढी एकादशीनिमित्त चिमुरड्या विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीची व वारकरी संप्रदायाची गोडी अगदी लहान वयातच अनुभवली, जी कौतुकास्पद आहे."

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg