loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळवली भुवडवाडी शाळेत साक्षरता वारी

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील भातगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवली भुवडवाडी या शाळेत आषाढी एकादशी निमित्त उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत साक्षरता वारीचे आयोजन करण्यात आले होते. या वारीमध्ये सर्व विद्यार्थी त्यांचे पालक व गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी सहभागी झाले होते. गणेश मंदिर व दत्त मंदिर येथून निघालेली वारी विठुरायाच्या नाम गजरामध्ये नवसाक्षरांना प्रोत्साहन आवाहन प्रेरणा देत घोषणा देत विठुरायाच्या गजरामध्ये पायी चालत चालत शाळेमध्ये आली. शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांचा माऊली माऊली हा डान्स उत्तम पद्धतीने सादरीकरण झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर नव साक्षर निरक्षर महिला बंधू-भगिनी यांना साक्षरतेचे महत्त्व शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कुळये यांनी समजावून सांगत, नवभारत साक्षरता कार्यक्रमांमध्ये त्यांची घेतली जाणारी परीक्षा या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सर्व नवसाक्षर उत्साहाने साक्षरता वारीमध्ये सहभागी झाले होते. शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी गावातील स्थानिक कार्यकर्ते संदीप शंकर ठोंबरे. संदीप जानू डिंगणकर, ग्रामपंचायत कर्मचारी अभिषेक चंद्रशेखर लिंगायत तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशी सचिन हुमणे व पदाधिकारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र कुळये व शिक्षक सतिश विचारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg