loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली परिसरात बिबट्याचे दर्शन; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बांदा (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील वाडकर हे रात्रीच्या सुमारास चारचाकीने प्रवास करत असताना इन्सुली मेटातील परिसरात त्यांच्या कारसमोर अचानक बिबट्या रस्ता ओलांडून गेला. या घटनेचा व्हिडिओ वाहनातील व्यक्तींनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रात्रीच्या अंधारात अचानक बिबट्या समोर आल्याने वाहनातील व्यक्तींमध्ये काही काळ घबराट पसरली. बिबट्याने काही क्षण रस्त्यावर थांबल्यानंतर जंगलाच्या दिशेने धाव घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, स्थानिकांमध्ये या परिसरात बिबट्यासोबत तीन लहान पिल्लेही असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत वन विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. इन्सुली मेटा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्कता बाळगावी, विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, लहान मुलांना एकटे सोडू नये तसेच पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. बिबट्याचा पुन्हा वावर आढळल्यास तात्काळ वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी, असेही सांगण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg