loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; दापोलीत आंदोलन विजयाचा आनंदोत्सव

दापोली (प्रतिनिधी) : नीट पेपरफुटी विरोधात जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी देशाच्या राजधानीत दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी संविधान पध्दतीने आणि लोकशाही मार्गाने केलेल्या तीव्र आंदोलनाचा धसका घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्क लढ्याला मिळालेल्या या यशाच्या पार्श्वभूमीवर दापोलीत सर्व पक्षीयांनी एकत्र येत हाती संविधान आणि तिरंगा घेत आनंदोत्सव साजरा केला. दापोली शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता मोठ्या संख्येने तरुण मुलं, महिला, उद्योजक, व्यापारी, पत्रकार बंधू वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे पदाधिकारी असा मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आनंदोत्सवासाठी जमा झालेल्या जनसमुदायाने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...., भारतीय संविधानाचा विजय असो...., विदयार्थी एक जुटीचा विजय असो अशा एका पेक्षा एक सरस अशा देण्यात आलेल्या घोषणांनी दापोली शहर दणाणून सोडले.यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रमुख ऋषिकेश गुजर, काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश मोरे, मनसे तालुकाध्यक्ष नितीन साठे, अॅड. विकास मेहता, अॅड. संदेश ऊर्फ नाना मोरे, अनिल जाधव, संदिप चव्हाण, मकबूल दिनवारे, जानकी बेलोसे, भारती शिंदे, रहुप काजी, प्रदिप गमरे, साईराज देसाई, सिराज रखांगे, श्रीकांत मुंगसे आदींसह विविध क्षेत्रातील भाजपा, शिंदे गट विरोधी सर्व पक्षीय यावेळी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg