loader
Breaking News
Breaking News
Foto

जोव्हेल डिसिल्वा यांना 'सह्याद्रीचे शिलेदार - राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार' जाहीर

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखिनीय कार्य करणारे सावंतवाडी येथील जोव्हेल डूमिंग डिसिल्वा यांना पहाट फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरतर्फे "सह्याद्रीचे शिलेदार - राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२६" जाहीर झाला आहे. ​पर्यावरण रक्षण आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पहाट फाउंडेशनच्या निवड समितीने या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​हा पुरस्कार वितरण सोहळा ८ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, या राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जोव्हेल डिसिल्वा यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg