loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजनवेल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल हरिनामाचा गजर, हजारो भाविकांची गर्दी

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट अंजनवेल व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्यातून आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये श्री विठ्ठल हरी नामाचा गजर सप्ताह कार्यक्रमानिमित्त हरिनामाचा गजर करण्यात आला. पंचक्रोशीतील गावातून अनेक विठ्ठल भक्तांच्या दिंड्या या मंदिरामध्ये आल्या होत्या. निसर्गरम्य व शिवकालीन इतिहास असलेल्या अंजनवेल गावातील प्रतिपंढरपूर म्हणून समजले जाणारे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांचे उपस्थिती होती. श्री विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्री विठ्ठल रखुमाई मंडळ आणि सहकारी, सिद्धेश्वर भजन मंडळ वेलदूर, श्री खेत्रपाल मित्र मंडळ सालवाडी महिला मंडळ अंजनवेल, नवतरुण मित्र मंडळ सडेवाडी सोनारवाडी खडपेवाडी, श्री विश्वकर्मा प्रसादिक भजन मंडळ सुतारवाडी, ग्रामीण विकास मंडळ भोईवाडी, मराठवाडी नवतरुण विकास मंडळ नंबर १, दत्तकृपा नवतरुण मंडळ गोंधळवाडी, श्री गोपाल कृष्ण मित्र मंडळ मराठवाडी तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताह मध्ये सहभाग घेऊन हरिनामाचा गजर केला. हरिनाम सप्ताह आषाढ शुद्ध पंचमीला सुरू होऊन आषाढ शुद्ध द्वादशी या दिवशी याची समाप्ती होते.

टाइम्स स्पेशल

अंजनवेल गाव मध्ये सन १८६७ या वर्षी ग्रामस्थांच्या मदतीने व वैश्यवाणी समाजाच्या पुढाकाराने विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी करण्यात आली. होती. तेव्हापासून या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम जोपासली आहे. या कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत (बाबा) देवळेकर, सचिव योगेश देवळेकर, खजिनदार विनय देवळेकर, विश्वस्त नरेंद्र देवळेकर सदानंद देवळेकर तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg