loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबईतील कंपनीत वायूगळती, ५० महिला कामगार बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गॅस गळतीची घटना घडली आहे. कार्बन मोनॉक्साईडच्या गळतीमुळे कंपनीतील तब्बल 25 महिला कामगार बेशुद्ध झाल्या असून, एकूण 27 जणांवर या विषारी वायूचा परिणाम झाला आहे. सर्व बाधितांना तात्काळ उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही घटना तुर्भे एमआयडीसी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळील डी-326 क्रमांकाच्या औद्योगिक युनिटमध्ये घडली. सकाळच्या सुमारास काम सुरु असतानाच महिला कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तर काहींना डोकेदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे जाणवू लागली. पाहता पाहता अनेक महिला बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरु करत सर्वांना बाहेर काढले.

टाइम्स स्पेशल

कंपनीतील 27 कामगारांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये बहुसंख्य महिला कामगार असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg