दापोली (प्रतिनिधी ) : दापोली विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना दापोली विधानसभा संपर्कप्रमुख सुधीर कदम यांच्या देखरेखीखाली दापोली तालुक्यातील दाभोळ तसेच बुरोंडी पंचायतसमिती गणातील मुंबईस्थित रहिवाशी चाकरमान्यांच्या गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दादर येथे भव्य अशा प्रकारचा विदयार्थी गुणगौरव सोहळा आणि करियर मार्गदर्शन शिबिराचे शिवसेनेच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. त्याला शैक्षणिक क्षेत्रातील नैपुण्य प्राप्तांसह विविध क्षेत्रातील गुणवंत मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याने मंत्री महोदय योगेश कदम यांच्या कल्पक नेतृत्व आणि मार्गदर्शनाखालील आयोजित केलेल्या शिवसेनेच्या सामाजिक कामाचा उद्देश चांगलाच सफल झाला.
आम. योगेशदादा कदम यांचेकडून विनाखंड दापोली विधानसभा मतदार संघात सन २०१६ पासूनच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, आरोग्यविषयक अशा समाज हितासाठीच्या उपयोगी अशा विविध आयोजनांचे आयोजन सामाजिक दायित्वाचे भान ठेवून करण्यात येत आहे. अशाच प्रकारे दापोली तालुक्यातील दाभोळ आणि बुरोंडी पंचायत समिती गणातील विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थी मार्गदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मुंबई दादर येथे पार पडला.
या गुणगौरव सोहळा कार्यक्रमात १० वी ते १२ वी तसेच पदवीधर विदयार्थ्यांसह विशेष प्राविण्य प्राप्तांना भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करत त्यांच्या पाठीवर कौतुकाच्या शाब्बासकिची थाप मारून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तर आगरवायंगणी येथील नेत्रा दत्तात्रय बेंडल या विदयार्थीनीने Msc. Engg. Sustainable Energy डेन्मार्क यूरोप, आर्या गणेश आंबेकर (आगरवायंगणी) हीने आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिल्ली २०२५ या स्पर्धेत १०० आणि २०० मिटर धावणे स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरी बद्दल तसेच ओणनवसे येथील प्राची दिनेश निवाते आटया पाटया या मराठमोळ्या खेळातील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात पालकांच्या उपस्थितीत त्यांच्या पाल्यांना खास करियर मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले. हे मार्गदर्शन समर्थ पालकर (समर्थ एडूकेअर) यांनी उत्तम असे केले. अशा या कार्यक्रमाला दापोली विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर कदम, शिवसेना दापोली तालुका मुंबई संघटक रणजित जाधव, शिवसेना दापोली तालूका मुंबई कार्यकारणी सचिव नरेश घरटकर , दाभोळ विभाग संघटक किशोर निवाते , बुरोंडी विभाग संघटक किरण नाचरे , दाभोळ उपविभाग संघटक अजय शिगवण, उप युवाधिकारी चंद्रकांत धुमाळ, चंद्रकांत रामाणे, सुरेश बेंडल, देवेंद्र इंगळे, शंकर महाडिक, सुनील निवाते, विनायक धुमाळ, बुरोंडी उपविभाग संघटक जनार्दन गोवले, सचिव संतोष घुबडे, बाळकृष्ण घडशे, मंगेश कदम, संतोष आडविलकर, सचिन चिपटे, मधुकर शिगवण, अशोक शिगवण आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास आदावडे यांनी केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.