loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: तिरंगी लढतीची शक्यता

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रांच्या छाननीनंतर तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये भाजप आणि शिंदे गट शिवसेना हे राज्याच्या पातळीवरील पक्ष थेट आमनेसामने उभे ठाकले आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेना यांच्यातही काहीशी बिघाडी दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत आज अर्जांची छाननी झाली.एकूण जागा: २० नगरसेवक पदासाठी ९४ तर नगराध्यक्ष पदासाठी वैध अर्ज: ६ उमेदवारी अर्ज छाननी नंतर रिंगणात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिलांसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत सहा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. ठाकरे शिवसेना (उबाठा) सीमा मठकर, भारतीय जनता पक्ष (भाजप) श्रद्धा सावंत भोसले, शिंदे शिवसेना ॲड. निता कविटकर सावंत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस साक्षी वंजारी, अपक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, अपक्ष निशाद बुराण रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या दहा प्रभागांमध्ये प्रामुख्याने शिंदे गट शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसने १६ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पाच जागांवर आपले नशीब आजमावत आहेत. ठाकरे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष आघाडी करून लढत आहेत. त्यांनी काही जागांवर तुल्यबळ उमेदवार दिले असल्याने तिथेही चांगली चुरस अपेक्षित आहे.

टाइम्स स्पेशल

२१ नोव्हेंबर आहे. या तारखेनंतर प्रत्येक प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मतदान २ डिसेंबर तर मतमोजणी (निकाल): ३ डिसेंबर रोजी होणार आहे. शहरात काही नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २१ नोव्हेंबरपर्यंत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षांना कसरत करावी लागणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या सहा उमेदवारांमुळे मतांची विभागणी होणार असून, नेमका कोणता उमेदवार बाजी मारतो, हे ३ डिसेंबरला स्पष्ट होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg