loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या नुपूर दफ्तरदारचे यश

रत्नागिरी : शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ८ वी महाराष्ट्र कॅडेट क्युरोगी व ५ वी पूमसे तायक्वांदो स्पर्धा साई सिल्वर लोन, शिर्डी ( अहिल्यानगर ) येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत कै.रमेश अनंत साळवी प्रतिष्ठान संचालित, पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी नुपूर दफ्तरदार हिने अप्रतिम कौशल्य दाखवत पूमसे प्रकारातील फ्री स्टाईल ग्रुप पूमसे प्रकारात सुवर्ण, वैयक्तिक पूमसे प्रकारात कास्य तसेच क्युरोगी (फाईट) रौप्य पदक पटकावत घवघवीत यश संपादन केले. तिला रत्नागिरी तालुका तज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ईशा गोताड, उपमुख्याध्यापिका श्रीम. रेखा जाधव तसेच सर्व शिक्षक यांनी तिला तिच्या या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल कै. रमेश अनंत साळवी प्रतिष्ठान या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव व कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg