loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडवली येथे भव्य संविधान रॅली उत्साहात

गुहागर-दोडवली (सचिन कुळये) : गुहागर तालुक्यातील दोडवली येथे भव्य संविधान रॅली उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. संविधान दिनाचे औचित्य साधून दोडवली गावातून भव्य आणि शिस्तबद्ध आणि मनाला स्पर्श करणार्‍या पद्धतीने संविधान रॅली पार पडली. त्यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांची न बोलता केलेली मेहनत, समर्पण आणि संवेदनशीलता दिसून आली. भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक माणसाला आणि विशेषत: महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढले आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला. त्याच संविधानाची रॅली वाजत गाजत गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून पार पाडली. खरं तर गावातील ग्रामस्थ महिला पुरूष यांच्या अथक प्रयत्नांमुळे संविधान ग्रंथाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या, ही बाब उल्लेखनीय असून, या उपस्थितीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज दोडवली गावामध्ये संविधान रॅली ही एकता, समता आणि बंधुतेचे प्रतीक ठरली. संविधान रॅली संपन्न होण्यासाठी आग्रही असलेले गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि अमृत महोत्सव समितीचे सल्लागार दत्ताराम निकम, प्रकाश जाधव, सोनू रामगडे, कुणबी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि अमृत महोत्सव समितीचे कार्यवाहक प्रकाश कांबळे (गावकर), अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण हुमणे व प्रदिप जाधव, सहखजिनदार सौ स्नेहल रामगडे, कुणबी ग्रामस्थ मंडळाचे सेक्रेटरी, ग्रामपंचायत सदस्य व अमृत महोत्सव समिती सदस्य संजय हुमणे, यशवंत कांबळे आणि मुख्याध्यापक प्रकाश जोगळे, सुमित बोबडे व शिक्षकवृंद यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. तसेच दोडवली बुद्ध विहार ट्रस्ट, पंचशील नगरचे सर्व पदाधिकारी व सहकार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले, त्याबदद्ल त्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले. अमृत महोत्सव समितीच्या सल्लागार यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच गावातील महिला, पुरुष, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी वर्ग यांच्या सहकार्यामुळेच ही संविधान रॅली जल्लोषात पार पडली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg