loader
Breaking News
Breaking News
Foto

नवीन घरांना ग्रामपंचायतीतून परवानगी मिळण्याकरिता राज्यमंत्री योगेश कदम यांना सुनील दळवी यांचे निवेदन

देवळे (प्रकाश चाळके) - शासनाच्या काही नियमांचा ग्रामीण भागातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो. सामान्य माणूस अशा नियमांची पुर्तता करताना मेटाकुटीस येतो. काही नियमांमुळे सामान्य माणूस हैराण होतो. अशातलाच प्रकार म्हणजे गावात नविन घर बांधताना काही कार्यालयांच्या परवानग्या घेण्यासाठी होणारा त्रास आणि जाणारा पैसा यांच्य मुळे नविन घर बांधू नये असंच काहीस वाटत आणि म्हणूनच सामान्य जनतेची मागणी अशी आहे की, ग्रामपंचायत अखत्यारीत नविन घर बांधताना पूर्वीप्रमाणेच परवानगी मिळावी, असे निवेदन गृहराज्य मंत्री योगेश कदम यांना कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य सुनिल दळवी यांनी दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घरकुल बांधताना कोणतीही नविन परवानगी लागत नाही मात्र स्वखर्चाने घर बाधायच म्हटलं की परवानग्या घ्याव्या लागतात.आणि घर बाधल तरी ते अनधिकृत म्हणून पावती दिली जाते. हीच बाब कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारिणी परिषदचे सदस्य सुनील दळवी यांनी गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांना निवेदन देऊन व चर्चा करुन ग्रामीण भागात ग्राम पंचायत अंतर्गत घराना परवानगी मिळावी याबाबत अधिवेशंंनामध्ये मागणी करण्याची विनंती केली. नगर पालिका, महानगर पालिकांना असणारे नियम ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला न लावता नविन घर बांधताना ग्राम पंचायतीना पूर्वीसारखीच नियमांचे पालन करुन परवानगी देण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी करावी असे निवेदन देवून विनंती केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg