loader
Breaking News
Breaking News
Foto

महाआघाडीच्या हाती सत्ता द्या देवरूख शहराचा कायापालट करुन दाखवू : सौ. नेहा माने

देवरूख (सुरेश सप्रे ) - देवरूख नगरपंचायत स्थापन - झाल्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. देवरूख शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी असूनही शहराची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. देवरूख शहर हे तालुक्याचे मुख्यालय असूनही अनेक सोयी सुविधांपासुन आजही वंचित आहे. शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा विकास आराखडयाचे काम गेली अनेक वर्षे रखडल्याने शहराची बिकट अवस्था झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी महाआघाडीच्या हाती सत्ता द्या. रखडलेला शहराचा विकास आराखडा मंजूर करून देवरूखचा कायापालट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी हा आमचा शब्द आहे अशी स्पष्टोक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महीला आघाडीच्या नेत्या व माजी जि. प सदस्या सौ. नेहा रवींद्र माने यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजापूर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या महिला विभागाच्या क्षेत्र प्रमुख व माजी जिप सदस्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक अशी विविध पदांवर काम करताना आपला वेगळा ठसा उमटलेल्या सौ. नेहा रवींद्र माने या दै. रत्नागिरी टाइम्स शी खास मुलाखत देताना बोलत होत्या. देवरूख नगरपंचाय निवडणूकीत जन सामान्यांना बदल हवाय हे प्रचारादरम्यान स्पष्ट दिसत असल्याने उबाठा शिवसेना-भारतीय काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व वंचित बहूजन आघाडी या महाआघाडीच्या नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना देवरूख शहरवासीयांची पहीली पंसती दीसत असल्याने शहरवासीय महाआघाडीच्याच हाती सत्ता देतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराला स्वतंत्र फिडर नसल्याने सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा, जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या अस्ताव्यस्त कचऱ्याचे ढीग यामुळे दुषित पाणी पुरवठा होवून शहरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता. मूठभर लोकांचे हित साधणारा करोडो रुपये खर्च करून शहरातील डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार. नियोजनाअभावी निर्माण झालेली कचऱ्याची समस्या तसेच प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅन) रखडलेले काम. उखडलेले रस्ते आदी विविध समस्यांमुळे देवरूख शहर त्रस्त झाले आहेत.

टाइम्स स्पेशल

गत दहा वर्षांत सत्ता असलेल्या सत्ताधिकाऱ्यांकडून करोडो रुपयांचा निधी शहरासाठी आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र दाखविण्यासारखे एक तरी काम सत्ताधाऱ्यांनी दाखवावे असे आव्हान सत्ताधाऱ्यांना करतानाच देवरूखवासियांनी महाआघाडीला जन सेवा करण्याची एकदा संधी दिल्यास देवरूख शहराचा कायापालट केल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट ग्वाही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेत्या सौ. नेहा माने यांनी दिली. शिवसेना उबाठा- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष ) वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सबुरी थरवळ उमेदवार या नवख्या असल्या तरी सामाजिक क्षेत्राची आवड, संयमी स्वभाव. शहर विकासाची तळमळ, दांडगा जनसंपर्क असलेल्या एक कर्तबगार व अभ्यासू महीला असलेल्या उमेदवार म्हणून पाहिले जाते असे ही त्यांनी सांगितले. त्यांचे पती तुषार( मुन्ना) थरवळ हे हरहुन्नरी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. ते समाजाच्या सर्व घटकांमधे वावरताना पक्षिय भेदभाव न करता जनतेचे प्रश्न समजावून घेऊन तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. आपला हक्काचा माणूस म्हणून त्याचेकडे पाहिलेले जाते . शहरातील राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक. क्रिडा आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वारसा आता त्यांच्या सुविद्य पत्नी सबुरी यांच्याकडे आला आहे. विकासकामांबरोबरच लोकांच्या व्यक्तिगत अडीअडचणी सोडविण्यासाठी रात्री अपरात्री धावत जावून त्यांना मदत करणे हे एकप्रकारचे व्रत मानून सौ. सबुरी व त्यांचे पती मुन्ना थरवळ हे "समाजसेवा हिच ईश्वर सेवा" या उक्तीप्रमाणे शहरातील सामाजिक क्षेत्रात आजही कार्यरत आहेत. देवरूख शहरातील पायाभूत सुविधा (रस्ते, गटारे, पाणी पुरवठा) अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार असून मुख्य रस्ते, नाले, फूटपाथ, गल्लीतील रस्ते. सुशोभित उद्याने. नाना नानी पार्क यांचे र्निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणेसाठी आमचा मास्टर प्लॅन तयार असल्याचे ही त्यांनी शेवटी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg