loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरळ येथील श्री वाघजाई देवी, काळकाई देवी मंदिर वर्धापन दिननिमित्त"कोकण रंग"लोकरंगांच्या सरी.. कार्यक्रम

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील सुरळ येथील श्री वाघजाई देवी, काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री वाघजाई देवी, काळकाई देवी मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री ग्रामदेवतेचा अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, त्यानंतर महिलांचे हळदी कुंकू समारंभ,वाघजाई भजन मंडळ सुरळ चव्हाणवाडी यांचे भजनी बुवा : सुर्यकांत चव्हाण आणि संजय चव्हाण यांचे भजन, महाप्रसाद, सायं. हरिपाठ: ह.भ.प. सुर्यकांत चव्हाण, रात्रौ वाघजाई देवी ग्रामस्थ मंडळ सुरळ यांचे नमन, त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त मनोरंजनात्मक कार्यक्रम.. कलाविष्कार कलामंच गुहागर प्रस्तुत"कोकणरंग"लोकरंगांच्या सरी.. एम एच. रत्नागिरी कोकणच्या लोककला अर्थात... यामध्ये नमन, जाखडी नृत्य, कोळीनृत्य, लावणी, होम मिनिस्टर व अशा विविध लोककलांचा ठेवा असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये संस्थापक: सुप्रिय जाधव, प्रणय घुमे, ओंकार भागडे तसेच यामध्ये कलाकार म्हणून यश पालशेतकर, यश साळवी, आदित्य कदम, ओंकार साटले, यश जोशी, स्वराज मयेकर, अथर्व साळवी, रिंकल आगरे, श्वेता घुमे, रसिका कांबळे, रसिका जोशी, सानिका गुरव, प्रांजळ बेटकर, साक्षी मोरे, वृंदा कांसे यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी सुरळ येथील श्री वाघजाई देवी, श्री काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg