loader
Breaking News
Breaking News
Foto

एफआयआर दाखल करण्यासाठी बारामतीकर आक्रमक

पुणे - अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बारामतीकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवार हे बारामती पोलिस ठाण्यात आले असून गेल्या एका तासांपासून ते पोलिस ठाण्यातच आहेत. जोपर्यंत एफआयआर दाखल करून घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही अशी आक्रमक भूमिका बारामतीकरांनी घेतली आहे. अजित पवारांना न्याय मिळावा, या मागणीसाठी बारामतीकरांनी पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आहे. रिक्षाचालकांपासून ते वकिलांपर्यंत सर्व बारामतीकर हे पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'सत्य सगळ्या जनतेसमोर आले पाहिजे. हा अपघात आहे की घातपात हे कळालेच पाहिजे. आम्ही बारामतीकर रोहित पवारांना साथ देणार आहे. अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही.', अशी भूमिका बारामतीकरांनी घेतली आहे. तसंच त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी बारामतीकरांनी 'एकच वादा अजितदादा', 'अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे', 'परत या परत या अजितदादा परत या', अशा घोषणा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg