loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेत पारंपरिक शेतीला चालना; विजेत्यांचा गौरव

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - शेतीची आवड निर्माण व्हावी तसेच सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेती वाचविण्यासाठी नांगरणी स्पर्धांसारखे उपक्रम आवश्यक आहेत. आज अनेक शेतकरी शेती करणे सोडत असून, प्रगत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन शेती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांनी केले. तुरळ येथील हरेकरवाडीमध्ये गणेश सेवा मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या विशाखा कुवळेकर, पंचायत समिती सदस्या अपर्णा जाधव, विजय कुवळेकर, अरविंद जाधव, कृष्णा हरेकर, सरपंच रामचंद्र हरेकर, दादू हरेकर, सुरेश भायजे, राजेंद्र सुर्वे, रघुनाथ बामणे, गोटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत ९० गावठी बैलजोड्या आणि ३० घाटी बैलजोड्यांनी सहभाग घेतला. गावठी बैलजोडी गट प्रथम : पाटगाव येथील बैलजोडी द्वितीय : अरविंद जाधव यांच्या बैलजोडी तृतीय : मार्लेश्वर येथील बैलजोडी

टाइम्स स्पेशल

घाटी बैलजोडी गट : प्रथम : गुरव (आरवली) यांची बैलजोडी द्वितीय : राजेंद्र चव्हाण (तुरळ) यांची बैलजोडी स्पर्धेला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पारंपरिक शेती संस्कृती जपण्याबरोबरच नव्या पिढीमध्ये शेतीविषयी आकर्षण निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg