loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवतर दत्तात्रयवाडी येथे श्री दत्तजयंती उत्सव सोहळा

खेड (वार्ताहर) -तालुक्यातील शिवतर दत्तात्रयवाडी येथील मुंबईकर ग्रामस्थ व महिला मंडळाच्यावतीने गुरुवार दि. ४ ते शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ पर्यंत शिवतर दत्तात्रयवाडी येथे श्री दत्तजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गुरुवार दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ - स्थापना,अभिषेक, होमहवन पूजा व आरती, दुपारी १२- स्थानिक सुस्वर भजन, सायं. ५:३० श्रीदत्त चरित्र पठण, सायं ६ - श्री दत्तजन्म सोहळा, सायं. ७ श्री दत्त भंडारा (अन्नप्रसाद), सायं. ७ :३० हरिपाठ, रात्रौ ९ - चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील किर्तनकार ह.भ.प. सतीश सावंत यांचे सुमधुर किर्तन, रात्रौ १२- गावातील भजनी मंडळाचे भजन व हरिनाम जागर, शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ५:३० - भव्य काकड आरती, सकाळी ९:३० ते दुपारी १- महाप्रसाद, दुपारी १२:३०- श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी ३ ते रात्रौ १०:३०- तीर्थप्रसाद, दुपारी ३ - श्रीदत्त पादुकांची पालखी मिरवणूक सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात, सनईच्या सुरात, फटाक्यांच्या आतीषबाजीत व श्रीदत्त नामाच्या जयघोषात श्री दत्त मंदिर येथून निघणार आहे. रात्रौ १०- स्थानिक स्वर भजनांचा कार्यक्रम.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १ - शिवतर दत्तात्रयवाडी विकास मंडळ आयोजित अंडरआर्म बॉक्सटाईप क्रिकेट स्पर्धा, दुपारी १:३०- टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सौजन्याने गावातील सर्व महिलांसाठी आरोग्य विषयक माहिती, दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, दुपारी ३:३० - महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, रात्रौ ९ - गुणवंत विद्यार्थी बक्षीस समारंभ व मान्यवरांचा सत्कार समारंभ व उत्सव सोहळ्याची सांगता रात्रौ १० वाजता कोकणचा साज संगमेश्वरी बाज या करमणुकीच्या कार्यक्रमाने होणार आहे. तरी सर्व दत्त भाविकांनी उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg