loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकसभा-विधानसभा निवडणूक लढविण्याचे वय २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार

नवी दिल्ली, : नीट-यूजी परीक्षेतील घोटाळा आणि वादानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिलेला राजीनामा हा युवा आंदोलनाचा मोठा विजय मानला जात असतानाच, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी देशातील तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेलंगणा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार असून, त्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढविण्याचे किमान वय २५ वरून कमी करून २१ वर्षे करण्याची मागणी करणारा ऐतिहासिक ठराव मंजूर केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

युवा आंदोलकांना संबोधित करताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, देशातील तरुण वयाच्या २१व्या वर्षी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी बनून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार हाकू शकतात, तर त्यांना आमदार आणि खासदार होण्याचा अधिकार का असू नये? जर्मनी, ब्रिटन आणि सिंगापूर या देशांचे उदाहरण देत त्यांनी सवाल केला की, जर तेथील १८ ते २१ वर्षांचे युवक देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात, तर भारत याच मार्गाने पुढे का जाऊ शकत नाही? भविष्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यास शिक्षण मंत्रालयासह इतर सर्व विभागांमध्ये तरुणांना महत्त्वाची भागीदारी दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केले की, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा आंदोलनाचा विजय असला, तरी लढाई अजून संपलेली नाही. आंदोलनादरम्यान लाखो विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत. तसेच नीट परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. या सर्व मागण्या आगामी संसदेच्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडण्याचे आवाहन त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि तेलंगणातील सर्व खासदारांना केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg