loader
Breaking News
Breaking News
Foto

अभिजीतला लग्नासाठी असंख्य फोन आईने सांगितलं, कशी हवी सूनबाई?

संंभाजीनगर, : सीजेपीचं आंदोलन यशस्वी झाल्यापासून अभिजीत दीपके यांच्या लग्नासाठी असंख्य फोन येत असल्याचे आता त्याच्या आईने म्हटले आहे. आधीही फोन येतच होते, पण आता आणखी जास्त येत आहेत. पण त्याच्या लग्नाचा योग जेव्हा येईल तेव्हा बघू. आधी त्याला यातून बाहेर पडू द्या, अशीही प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांच्या आईने दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सूनबाई कशी पाहिजे, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, आता हे त्याच्या मनावर आहे. सून सर्वसामान्य, साधारण असावी, अशी मला अपेक्षा होती. पण आता तो एवढ्या लेव्हलला गेला आहे की त्यामुळे आता पत्नी निवडण्याचा निर्णय त्याच्यावर आहे. आयुष्याची जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. आम्ही त्याला पाठिंबा देण्याचं काम करणार आहोत. आता आधीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी आई-वडील म्हणायचे, या मुलीशी लग्न कर, तर लग्न व्हायचं. आता तसं नाही. आता मुलांचे विचार वेगळे आहेत.

टाइम्स स्पेशल

यावेळी अभिजीत यांच्या आईवडिलांनी त्यांच्या पुढील भूमिकेविषयीही प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या भूमिकेविषयी मला काही सांगता येणार नाही. कारण पुढे तो काय करतो हे मलासुद्धा माहीत नाही. आता अभिजीत जी कोणती भूमिका घेईल, त्याला माझा पाठिंबा असेल, असं आईने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दीपके यांची कॉकरोच जनता पार्टी अडून बसली होती. अखेर जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा ‘आज लोकशाही विजयी झाली’ असं म्हणत त्यांनी सर्व आंदोलकांचं अभिनंदन केलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg