सांगली, : एकाच आंब्याच्या झाडावर देश-विदेशातील तब्बल २२ जातींचे आंबे घेण्याची आश्चर्यकारक कामगिरी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंतराळ गावचे शेतकरी काकासाहेब सावंत यांनी केली आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे एकाच झाडावर विविध जातींचे आंबे पाहण्याची संधी मिळत असून, हा प्रयोग शेतकर्यांसाठीही कुतूहलाचा विषय ठरला आहे. काकासाहेब सावंत यांनी एकाच आंब्याच्या झाडावर देश-विदेशातील आंब्यांच्या तब्बल ४४ वाणांचे कलम केले होते. त्यापैकी २२ वाणांची कलमे यशस्वी झाली असून, यंदाच्या हंगामात या एकाच झाडावर २२ प्रकारचे आंबे लागले आहेत. या २२ जातींच्या आंब्यांची एकूण संख्या सुमारे ७०० इतकी आहे.ङ्गङ्गयामध्ये केसर, हापूस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिशा, पायरी, बारामासी, वनराज, मलगोबा, मल्लिका आणि तोतापुरी यांसह देशी तसेच काही विदेशी आंब्यांच्या जातींचा समावेश आहे.
मूळचे नर्सरी व्यवसाय करणारे काकासाहेब सावंत पुण्यात नोकरी करीत होते. मात्र, शेतीच्या प्रेमापोटी त्यांनी पुण्यातील नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. जत हा दुष्काळी भाग असतानाही त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा ध्यास घेतला. त्यातूनच त्यांच्या शेतीला वेगळी दिशा मिळाली. काकासाहेब सावंत यांचा रोपवाटिकेचा व्यवसाय आहे. नर्सरी व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्याकडे विविध प्रकारच्या रोपांची उपलब्धता होती. शेतीतील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी विविध जातींची तसेच संकरित झाडांची रोपे तयार केली आहेत.
‘आंब्याच्या प्रत्येक जातीची रोपे आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर एकाच झाडावर विविध जातींचे आंबे घेण्याचा प्रयोग का करू नये?’ असा विचार त्यांच्या मनात आला. मात्र, प्रत्येक जातीचे स्वतंत्र झाड लावण्यासाठी मोठ्या जागेची आणि गुंतवणुकीची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी एकाच झाडावर विविध जातींच्या आंब्यांची कलमे करण्याचा प्रयोग केला. या प्रयोगातून एकाच झाडावर विविध आंब्यांच्या जातींची कलमे करण्यात आली. त्यापैकी २२ जातींची कलमे यशस्वी ठरली आणि त्यातूनच यंदा २२ प्रकारचे देशी-विदेशी आंबे चाखण्याची संधी मिळाली.जागेची बचत आणि विविध जातींचे उत्पादन एकाच झाडावर घेण्याचा हा अनोखा प्रयोग शेतीतील नवकल्पनेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.