loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीला १५ कोटींची मोठी भेट; अत्याधुनिक नाट्यगृह उभारणीला राज्य शासनाची मंजुरी

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, दापोली नगरपंचायत हद्दीत अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगर विकास विभागाने २४ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, नाट्यगृह उभारणीच्या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च राज्य शासन उचलणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी दापोली नगरपंचायतीमार्फत करण्यात येणार असून, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता पूर्ण झाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

टाइम्स स्पेशल

दापोली शहरातील गाडीतळ भागातील जुनी धर्मशाळा येथे हे व्यापारी संकुल व नाट्यगृह बांधण्यात येणार असून दापोलीचे आमदार तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी या नाट्यगृहासाठी निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले. या नाट्यगृहामुळे दापोली व परिसरातील नाट्य, सांस्कृतिक, साहित्यिक तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ मिळण्याबरोबरच सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg