loader
Breaking News
Breaking News
Foto

माई ह्युंदाई, रत्नागिरीतर्फे आषाढी एकादशी निमित्त ‘भक्तीरंग’ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त माई ह्युंदाई, रत्नागिरी यांच्या वतीने ‘भक्तीरंग’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदित्य लिमये यांच्या सुश्राव्य गायनाने रत्नागिरीकरांना आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अनोखी मेजवानी दिली. आदित्य लिमये यांना तबला केदार लिंगायत, पखवाज पुष्कर सरपोतदार, ऑर्गन महेश दामले, व्हायोलिन उदय गोखले, तालवाद्य प्रथमेश घाटे यांनी साथ केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात आदित्य लिमये यांनी 1) हृदयाच्या तालावर नाचे गणेश, 2) आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, 3) राजस सुकुमार, 4) विष्णुमय, 5) सुखाचे जे सुख, 6) अबीर गुलाल, 7) आकल्प आयुष्य, 8) वेढा वेढा रे पंढरी, 9) युवती मना (नाट्यगीत), 10) वृंदावनी वेणू, 11) कमले कमालालये, 12) हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, 13) भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, 14) नाही पुण्याची मोजणी, 15) भैरवी - कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ही गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या सुश्राव्य कार्यक्रमाचं आशयपूर्ण निवेदन दिप्ती आगाशे यांनी केलं. या कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि शिरगांव, रत्नागिरी येथील प्रसिध्द आंबा बागायतदार प्रकाश वामन थत्ते यांचे विशेष सहकार्य मिळालं.

टाइम्स स्पेशल

माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे म्हणाले, रत्नागिरीमधील माई ह्युंदाईच्या पहिल्याच कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. यापुढेही ग्राहकांसाठी रत्नागिरीसह चिपळूण, दापोली, कुडाळ येथे भविष्यात असे कार्यक्रम घेऊ. अर्थात ग्राहकांनीसुद्धा माई ह्युंदाईच्या शोरूम्समध्ये भेटी देऊन ह्युंदाई कार्स चालवून बघाव्यात. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या ग्राहकांचं स्वागत बिझनेस हेड विनोद मातेरे, सेल्स हेड समीर सुर्वे, आनंद लिमये यांनी केलं. माई ह्युंदाईच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg