loader
Breaking News
Breaking News
Foto

‘केवळ आंदोलन झाल्याने लाठीचार्ज करु शकत नाही’, जंतरमंतर वरील पोलिस कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले की, शांतीपूर्ण आणि कायद्याने विरोध हा अधिकार घटनात्मकदृष्ट्या सुरक्षित आहे. फक्त आंदोलनाने लाठीचार्ज योग्य ठरू शकत नाही. मुख्य न्यायाधीश सुर्यकांत, जस्टीस जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती वी. मोहना यांच्या पिठाने पेपरलीक मुद्दयावर देशभरात विरोध आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिस बलाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करणार्‍या याचिकेबाबत न्यायालयाने आपले तोंडी मत व्यक्त केले. न्यायालयाने असेही, म्हटले की पोलिसांमार्फत अतिरेक झालेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी व्हायला पाहिजे. तसेच न्यायालयाने देशभरातील आंदोलनाबाबत एक समान पोलिस नियमावली आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनात्मक दृष्टीकोनातून शांतीपूर्ण आंदोलन करणे हा अधिकार सुरक्षित आहे. विरोध होत आहे म्हणून बलाचा अतिरेक करता येवू शकत नाही. हे फक्त प्रकरण दिल्लीपुरते मर्यादित नसून विरोध केला म्हणून लाठीचार्ज होवू शकत नाही. लोकशाही प्रक्रियेत याचे अनुशासन महत्वाचे आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg