loader
Breaking News
Breaking News
Foto

मी एक करोड देतो, मुलगी परत द्या.., नीट पेपरलीक झाल्याने विद्यार्थी विद्यार्थीनींच्या आत्महत्या

नवी दिल्ली - नीट पेपरलीक विरोधात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपले आहे. केद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामाही दिला आहे. मात्र एक दुःखद बातमी अशी आहे की, महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात जलालकुट येथे राहणारी अंकिता सांगले हिने आत्महत्या केली आहे. पहिल्या नीट परिक्षेसाठी तिने अभ्यास केला होता. आणि ती परिक्षा रद्द झाली. दुसर्‍या परिक्षेत तिला १६६ गुण मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नीट पेपर लीक झाल्यने २० मुलांनी आत्महत्या केली. त्यामध्ये राजस्थानच्या झुनझुनू जिल्ह्यातील प्रदीप मेघवाल या २२ वर्षीय हुशार अशा तरुणाने मे २०२६ मध्ये परिक्षा रद्द झाल्याने आत्महत्या केली. उत्तर प्रदेशचा ऋतिक मिश्रा वय २१, सिद्धार्थ -गोवा वय १७, भाग्यश्री -कर्नाटक कलबुर्गी वय १८,अंशिका पांडेय -दिल्ली आदर्शनगर वय २०, उमेश माली -राजस्थान सीकर वय २२, रेणूका मिना -अलवर १८ वर्ष, दिया कुमारी थापा- उत्तराखंड २३ वर्ष, शिवानी यादव- लखनौ उत्तरप्रदेश १७ वर्ष, कहान पटेल -अहमदाबाद गुजरात वय १७, आकांक्षा चतुर्वेदी -मऊगंज मध्यप्रदेश वय १८, रिमा बेगम- आसाम वय २१, अवंतिका मोर्य -वय २१, जतिन कुमार -गाझियाबाद उत्तरप्रदेश २२ वर्ष, एस.गोपिका सलेन- तामिळनाडू वय १९, शेख सना- हैद्राबाद तेलंगणा वय १९, वेत्रीय नंदम -हौसून तामिलनाडू वय २०, सिमरन हिसाब- हरीयाणा १९, रोशनी धर्मपुरी- तामिळनाडू वय १९, अंकिता सांगले -अहिल्यानगर महाराष्ट्र १९, या मुलांनी नीट परिक्षेचा अभ्यास ६ महिनेपेक्षा अधिक कालावधी सातत्याने दिवसरात्र केला. मात्र काहींनी परिक्षा रद्द झाल्याने तर काहींनी गुण कमी पडल्याने आत्महत्या केली. अंकिता सांगलेच्या वडिलांनी म्हटले आहे की, मी १ करोड देतो मला मुलगी परत द्या..

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg