loader
Breaking News
Breaking News
Foto

शरद देवळेकर यांचा एस.टी. महामंडळ सेवापूर्तीचा गौरव सोहळा थाटात

दापोली प्रतिनिधी – एस.टी.महामंडळ क्षेत्रात 27 वर्षे अपार कष्ट, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सचोटीने सेवा देणाऱ्या शरद देवळेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांकडुन आयोजित करण्यात आलेला सत्कार व निरोप समारंभ अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात दापोली एस.टी. आगार येथे पार पडला ते वाहतूक नियंत्रक या पदावरुन निवृत्त झाले आहेत. देवळेकर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये 11 सप्टेंबर 1997 रुजु झाले होते. दापोली मंडणगड येथे नोकरी करत असताना सुरुवातीला त्यांनी वाहक म्हणून काम पाहिले. दापोली डेपो मध्ये वाहक पदी नोकरी करत असताना रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई आणि गावखाते अशी 2020 पर्यंत प्रवाशी सेवा केली. काही काळ त्यांनी कंट्रोल केबिन मध्ये काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन 2023 साली हंगामी वाहतुक पदी त्यांना बढती मिळाली तर काही दिवसांनी दाभोळ येथे त्यांची वाहतुक नियंत्रक पदी कायम निवड झाली. सेवानिवृत्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दापोली एस.टी. आगारचे आगारप्रमुख उबाळे यांनी भूषवले. या कार्यक्रमास अकाउंट खानविलकर, कार्यशाळा अधिक्षक मुनाफ राजापकर, जालगांवचे माजी सरपंच मंगेश सैतवडेकर, नाफाड आदी मान्यवर, सहकारी, हितचिंतक मंगेश सैतवडेकर मित्र परिवार, नातेवाईक, संघटनेचे प्रतिनीधी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी अनेक मान्यवर,सहकारी कर्मचारी यांनी देवळेकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छां देताना त्यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल कौतुक केले दापोली आगारप्रमुख उबाळे यांनी देवळेकर यांचा प्रभावी आणि हृदयस्पर्शी आयुष्याचा, कर्तृत्वाचा जिवनपट तसेच संयमी स्वभावाचा, प्रामाणिकतेचा, कष्टाळूपणाचा आणि सेवेतील योगदानाचा आढावा आपल्या खास शैलीत समारोपाच्या मनोगतात उलगडून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत झिंगे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg