loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर कसबा येथे किराणा मालाचे दुकान फोडले, माल लंपास

संगमेश्वर ( प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील ’रफिक मार्ट’ या किराणा मालाच्या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ६० हजार ३४० रुपये किमतीचा किराणा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी, २५ जुलै रोजी रात्री १०:०० ते रविवारी, २६ जुलै रोजी सकाळी ८:३० या कालावधीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कसबा उभा मोहल्ला येथील रहिवासी मुमताज रफिक मेमन (वय ४६) यांचे कसबा येथे ’रफिक मार्ट’ नावाचे किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर, रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानातील महागडा किराणा माल लबाडीच्या इराद्याने चोरून नेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरीस गेलेला माल - चोरट्यांनी दुकानातून खालील वस्तू लांबविल्या आहेत. साखर: ४,००० रुपये किमतीच्या ५० किलो वजनाच्या २ गोण्या, मिरची १६,००० रुपये किमतीची ३५ किलो वजनाची २ पोती, जिरा ६,००० रुपये किमतीची ३० किलो वजनाची १ बॅग, जेमिनी सनफ्लॉवर तेल १०, २०० रुपये किमतीचे ८०० मिलीचे ५ बॉक्स (एकूण ६० पाकिटे) आणि ७,७४० रुपये किमतीच्या १३ किलोच्या ३ बरण्या, राजा सोया तेल ८,८०० रुपये किमतीच्या १३ किलोच्या ४ बरण्या, इतर किराणा सामान: सुमारे ७,६०० रुपयांचे इतर साहित्य..

टाइम्स स्पेशल

रविवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दुकानाच्या मालकीण मुमताज मेमन यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीमुळे स्थानिक व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg