loader
Breaking News
Breaking News
Foto

सोमेश्वर उबाठा माजी सरपंचांसह विभागप्रमुखांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी - शिवसेनेच्या विकासकार्यावर विश्वास ठेवून उबाठाचे माजी सरपंच गजानन बोरकर, विभाग प्रमुख बाबू मयेकर आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे व कार्यकर्त्यांचे पक्षात मनापासून स्वागत करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका प्रमुख बंड्या साळवी, बाबूशेठ म्हाप यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य आबा भोसाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदेश मयेकर, बाबू पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg