loader
Breaking News
Breaking News
Foto

छ. संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे मध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

जामगे - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेमध्ये दिनांक २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या व कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, एनसीसी विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवस या विषयावरील ॲक्ट सादर केला. प्रशालेचे प्राचार्य डॉ. खोत सर व प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन यादव यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची माहिती देत विद्यार्थ्यांना देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यभावनेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन हिरेमठ यांनी केले. शहीद जवानांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर खोत, प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन यादव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg