loader
Breaking News
Breaking News
Foto

कारभाटले गावचा सुपुत्र अक्षय वारोसे यांची स्पेशल पोलीस फोर्समध्ये निवड

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - अक्षय वारोसे हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन मुंबई येथे पोलीस दलात नुकताच भरती झालेला आहे. अक्षयची घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून विद्यार्थी तसेच असताना शेतीच्या कामाबरोबर रोजंदारीचे काम करायचा. परंतु त्याने पोलीस दलात भरती व्हायचं स्वप्न पाहिलेल होत, आणि ते स्वप्न साकारण्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्टा करून यश मिळवले. ही भरती होण्यापूर्वी दोन वेळेस भरतीला गेलेला असताना दोन्ही वेळेला त्याला अपयश खरं, परंतु त्या अपयशावर मात करून त्याने तिसऱ्यांदा प्रयत्न करून तो यशस्वी झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वारोसे कुटुंबातील कदाचित अक्षय हा पहिलाच पोलीस दलात भरती झालेला असावा आणि त्याने पाहिलेला स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. आई-वडिलांच्या तसेच त्याच्या मेहनतीचं, कष्टाचे चीज झाल्याचे समाधान त्याच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर तसेच वारोशे कुटुंबीयांसह अक्षयचा मित्रपरिवार तसेच गावासह कारभाटले पंचक्रोशीच्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. अक्षयच्या यशाबद्दल कारभाटले पंचक्रोशीच्या वतीन हार्दिक अभिनंदन व पूढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg