loader
Breaking News
Breaking News
Foto

चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वेश वाडेकरचे घवघवीत यश; 298 पैकी २६८ गुण मिळवत उज्ज्वल कामगिरी

संगमेश्वर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धामणी नं. १ येथील विद्यार्थी सर्वेश कारभारी वाडेकर याने इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत 298 पैकी तब्बल २६८ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्वेश याने इयत्ता पहिलीपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धामणी नं. १ येथे शिक्षण घेतले आहे. त्याच्या या यशामागे त्याचे पालक, मार्गदर्शक शिक्षक तसेच शाळेतील शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्वेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी परीट, कडवई बीटचे विस्तार अधिकारी बळवंतराव, केंद्रप्रमुख चांदे, शाळेचे मुख्याध्यापक गेल्ये, शिक्षकवृंद तसेच पालकवर्ग यांनी सर्वेशचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवू शकते, हे सर्वेशच्या यशाने सिद्ध केले आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg