संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे शिंदेंसेनेचे विभागप्रमुख व कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन नुकतेच सम्पन्न झाले. यावेळी बोलताना शिंदेंसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी आगामी काळात होणार्या कडवई ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत वसंत उजगावकर यांच्यामाध्यमातून शिंदेंसेनेचा भगवा कडवई ग्रामपंचायतीवर फडकेल, असे सूतोवाच केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पर्शवभूमीवर कडवईमध्ये विविध राजकीय पक्षांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. शिंदेंसेनेचे विभागप्रमुख वसंत उजगावकर यांनीही मुंबई-गोवा महामार्गानजिक कडवई तुरळ फाटा येथे आपले जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.
शिंदेंसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या प्रमुख उपस्थितित या कार्यालयाचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना पंडित यानी वसंत उजगावकर याच्या कार्याचे कौतुक केले. आगामी कडवई ग्रामपंचायत निवडणुकीत वसंत उजगावकर यांच्या माध्यमातून कडवई ग्रामपंचयतीवर शिंदेंसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. संगमेश्वर दक्षिणचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनीही शुभेच्छा देताना वसंत उजगावकर यांच्या सामाजिक कार्याची दखल कडवईतील जनता नक्कीच घेईल, असा विश्वास व्यक्त केला. संगमेश्वर दक्षिणचे तालुकाप्रमुख कृष्णा हरेकर यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून उजगावकर आपला संपर्क वाढवतील व त्याचा फायदा भविष्यात शिंदेंसेनेला होईल, असा विश्वास व्यक्त केला.
वसंत उजगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना नेहमीच कडवईच्या जनतेच्या संपर्कात होतोच. मात्र या कार्यालयाच्या माध्यमातून हा संपर्क वाढेल, असे सांगितले. तर कोणत्याही कामासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून आपण सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असू, असे आश्वासन दिले. यावेळी संदेश फडकले यांना युवासेना विभागप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली तर नुकतेच भाजपमधून आलेले निहाल खान यांना उपविभागप्रमुख पद देण्यात आले. यावेळी हरिचंद्र सुर्वे, माजी सरपंच बापू कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिस खान, जमाते मुस्लिमीन कडवई चे चेअरमन सिकंदर जुवळे, सनी प्रसादे, विश्वास चाळके, मारुती शिंदे, सदानंद ब्रीद, नौशाद मोडक, मारुती किंजळकर, संतोष मादगे, गुणाजी ओकटे, बबन कांबळे, सोनू उजगावकर, दत्ताराम साळवी, मनोहर धामनाक, आदी मान्यवर उपस्थित होते.









































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.