पुणे (जितेंद्र गावडे) :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत दुसऱ्या लढतीत गौतमी नाईक(७०धावा) हिने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ४ गडी राखून पराभव करून शानदार सुरुवात केली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना रायगड रॉयल्स संघाने २० षटकात ८बाद १५९ धावा केल्या. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार किरण नवगिरे(१९), भाविका आहिरे (१७), आदिती गायकवाड(१३) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर प्रज्ञा वीरकरने २८ चेंडूत ५चौकारासह ३४ धावा काढून संघाचा डाव सावरला. तिला यशोदा घोगरे नाबाद २३, आयेशा शेख १६ यांनी धावा काढून साथ दिली. रत्नागिरी जेट्सकडून संजना वाघमोडे(२-२५), प्रियांका घोडके(१-२४), भक्ती मिरजकर(१-२२), ऋतुजा काळे(१-२८) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
१५९ धावांचे लक्ष्य रत्नागिरी जेट्स संघाने १९.५ षटकात ६ बाद १६० धावा काढून पूर्ण केले. गौतमी नाईक व स्मृति मंधाना या सलामीच्या जोडीने ५६ चेंडूत ८५ धावांची भागीदारी करून संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यात गौतमी नाईकने शानदार अर्धशतक साजरे केले. डब्लूएमपीएलमधील हे दुसरे अर्धशतक ठरले. गौतमीने ४६चेंडूत ७० धावांची आक्रमक खेळी केली. गौतमीने ११चौकार व १ षटकार मारला. स्मृति मंधाना २६ चेंडूत ३५ धावा काढून तंबूत परतली. त्यात तिने २चौकार व २ षटकार खेचले. स्मृतिला रायगड रॉयल्सच्या आदिती गायकवाडने झेल बाद केले. त्यानंतर प्रियांका घोडके(७), भक्ती मिरजकर(०) हे मधल्या फळीतील फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. गौतमी देखील ७० धावांवर खेळत असताना रायगडच्या आयेशा शेखने उत्तम क्षेत्ररक्षण करत तिला धावबाद केले. यावेळी रत्नागिरी जेट्ससमोर विजयासाठी ३२ चेंडूत ४२ धावा असे आव्हान होते. हे आव्हान रसिका शिंदे १४, शिवाली शिंदे नाबाद १९ यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. रायगड रॉयल्स: २० षटकात ८बाद १५९ धावा(प्रज्ञा वीरकर ३४(२८,५x४), यशोदा घोगरे नाबाद २३, किरण नवगिरे १९, भाविका आहिरे १७, आयेशा शेख १६, आदिती गायकवाड १३, संजना वाघमोडे २-२५, प्रियांका घोडके १-२४, भक्ती मिरजकर १-२२, ऋतुजा काळे १-२८) पराभूत वि. रत्नागिरी जेट्स: १९.५ षटकात ६ बाद १६०धावा(गौतमी नाईक ७०(४६,११x४,१x६), स्मृति मंधाना ३५(२६,२x४,२x६), रसिका शिंदे १४, शिवाली शिंदे नाबाद १९, यशोदा घोगरे २-१८, रोशनी पारधी १-३७); सामनावीर - गौतमी नाईक.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.