loader
Breaking News
Breaking News
Foto

सैनिक स्कूल जामगे मध्ये आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात साजरा

खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे प्रशालेमध्ये दिनांक 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी रिंगण,अभंग, भजन आणि विठ्ठल नामाचा गजर करून संपूर्ण परिसर भक्तिमय केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडी काढली. टाळ-मृदुंगाच्या गजरात "ज्ञानोबा-तुकाराम"चा जयघोष करण्यात आला. नगारे सरांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन यादव, प्रशालेचे प्राचार्य डॉ. खोत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेबद्दल अभिमान निर्माण झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg