loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभानवल्लीत बल्लाळ गणेश देवस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात

लांजा, (सागर गोवळे) : तालुक्यातील प्रभानवल्ली येथील ऐतिहासिक बल्लाळ गणेश देवस्थान व परमपूज्य रामचंद्र वासुदेव देसाई यांच्या स्मृतीस्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. परमपूज्य देसाई महाराजांना श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दृष्टांतानुसार काळाच्या पडद्याआड गेलेले ऐतिहासिक बल्लाळ गणेश देवस्थान शोधून काढले होते. त्यांच्या भक्तांच्या सहकार्याने या देवस्थानाचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्यांच्या पश्चात प्रभानवल्ली येथे त्यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात आले असून, महाराज आजही तिथेच सूक्ष्म रूपाने अस्तित्वात आहेत, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथे बल्लाळ गणेश आणि देसाई महाराजांचे दर्शन घेतल्यास माणसाची कुठलीही असाध्य कामे सहजतेने पूर्ण होतात, असा दृढविश्वास परिसरातील नागरिकांमध्ये आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री बल्लाळ गणेश व इतर देवतांचे विधिवत पूजन करण्यात आले. परमपूज्य रामचंद्र वासुदेव देसाई महाराजांच्या पादुकांवर जयवंत माजळकर यांच्या हस्ते जलाभिषेक व पूजन सोहळा पार पडला. अभिषेकनांतर महाआरती करण्यात आली, ज्याचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अनिल चव्हाण आणि सहकाऱ्यांचे भजनाचा कार्यक्रम पार पडला.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्याला देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष अमोल रेडीज, सचिव वसंत पावसकर, उत्सव समिती अध्यक्ष भरत पाटील व चंद्रकांत उर्फ पप्पू धनावडे. नूरमोहम्मद डबीर, मंगेश जाधव, जयवंत माजळकर, रवींद्र पराडकर, तसेच सल्लागार बाळूराव ब्रीद. गुरु मासये, जयवंत जाधव, सुनील गुरव, शशिकांत चव्हाण, विकास बेर्डे, उमेश खानविलकर, शरद चव्हाण, विठोबा नागवेकर, उदय जमेनीस, पांडुरंग साळुंखे, प्रमोद धनावडे, सुधीर जोशी यांच्यासह बहुसंख्य भाविक उपस्थित होते. भक्तांच्या सप्तरंगी उत्साहात आणि धार्मिक वातावरणात हा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत सुफळ संपूर्ण पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg