loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या जामसंडे देवगड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’चे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता राधेश्याम बँक्वेट अँड लॉन्स, वडपणानगरी, जामसांडे (ता. देवगड) येथे होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत असून, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी शिबिरात उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन तसेच योजनांबाबतची माहिती देणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिरामध्ये महसूल विभागासह पंचायत राज, महिला व बालविकास, आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, वन, कौशल्य विकास, उद्योग, पुरवठा, ग्रामविकास, दिव्यांग कल्याण, जलसंपदा, पोलीस, शिक्षण आणि इतर विभागांच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच विविध दाखले, प्रमाणपत्रे, शासनाच्या कल्याणकारी योजना, जनजागृती, मार्गदर्शन आणि अर्ज स्वीकारण्याची सुविधाही या शिबिरात उपलब्ध राहणार आहे.

टाईम्स स्पेशल

शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि त्यांना विविध कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नयेत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहून उपलब्ध सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार, देवगड यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg