loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंढरचे ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांना ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान’ जाहीर

आबलोली(संदेश कदम)- नालंदा ऑर्गनायझेशन या नामांकित संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या एका विशेष सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, मुंढर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुरेश बाब्या गोरे यांची ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण भागाचा विकास आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात सुरेश गोरे यांनी मुंढर ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्या या उत्कृष्ट आणि पारदर्शक कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या याच अविरत सेवेचा आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी,नालंदा ऑर्गनायझेशनच्या वतीने त्यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

हा मानाचा पुरस्कार येत्या १ ऑगस्ट रोजी पुणे येथे आयोजित सोहळ्यात सुरेश गोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशामुळे मुंढर गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एका शासकीय अधिकार्‍याने लोकसेवेचा वसा कसा चालवावा? याचेच उत्तम उदाहरण सुरेश गोरे यांनी घालून दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg