loader
Breaking News
Breaking News
Foto

धाकोरे शाळेचा अभिनव उपक्रम; 'रानभाज्या प्रदर्शन व विक्री महोत्सवा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आधुनिक जीवनशैलीत फास्ट फूडचे वाढते आकर्षण आणि त्यातून वाढणाऱ्या आजारपणाला सकारात्मक पर्याय देत जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, धाकोरे येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून रानभाज्या प्रदर्शन व विक्री महोत्सव उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व समजावे, परिसरातील औषधी वनस्पतींची ओळख व्हावी आणि व्यवहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या 'रानभाज्या प्रदर्शन व विक्री महोत्सवा'ला परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध प्रकाराच्या भाज्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात आणल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशश्री पवार , उपाध्यक्ष रविंद्र मुळीक,सरपंच स्नेहा मुळीक, उपसरपंच, सोनू गवस वसवाचे तळे शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन रणशूर, अंगणवाडी ताई मनाली साटेलकर, पोलीस पाटील श्रीराम प्रभूराळकर, मदन मुरकर, ग्राम सखी सीआरपी अपर्णा प्रभुराळकर व ग्राम संघसचिव सुगंधा ठाकूर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या महोत्सवात परिसरातील विविध प्रकारच्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच विक्री करण्यात आली. गावातील ग्रामस्थ, पालक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मुख्याध्यापक दिगंबर तळणकर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांना परिसरातील औषधी रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांच्या पोषणमूल्यांची माहिती मिळावी आणि व्यवहारिक कौशल्य विकसित व्हावे, या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सरपंच स्नेहा मुळीक यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध औषधी व आरोग्यदायी रानभाज्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास उत्तम आरोग्य राखण्यास मदत होते, असे सांगितले. तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर यांनी रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

कोकण हा निसर्गसंपन्न असून येथे विविध औषधी वनस्पती आणि रानभाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यवहारिक कौशल्य वाढते तसेच निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ होते. निसर्गाची ही समृद्ध परंपरा जपत रानभाज्यांचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराविषयी जागरूकता निर्माण झाली असून पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे पदवीधर शिक्षक सोनल जाधव तर प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर यांनी केले. यावेळी उपस्थित पालकांनी, ग्रामस्थांनी मुलांकडून रानभाज्या खरेदी करून त्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. यावेळी मुलांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg