वेळणेश्वर (उमेश शिंदे) : विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त, निरोगी व सुसंस्कारित जीवनाची दिशा मिळावी तसेच तंबाखू व विविध मादक पदार्थांच्या वाढत्या व्यसनापासून त्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १ येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "व्यसनमुक्ती" या विषयावरील प्रेरणादायी सुसंवाद कार्यक्रम आणि जनजागृती पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात गीता बहेन (खेड सेंटर प्रमुख), दीपा बहेन (चिपळूण सेंटर प्रमुख), सीमा बहेन (गुहागर सेंटर प्रमुख), संगीता बहेन (गुहागर सेंटर) तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे अन्य मान्यवर विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमात व्यसनमुक्ती विषयावरील आकर्षक पोस्टर प्रदर्शन भरविण्यात येणार असून, तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य व इतर मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम प्रभावी चित्रफिती व पोस्टरच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्त शाळा अभियानाला बळकटी देणारा हा उपक्रम विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सर्व विद्यार्थी व पालकांनी आपल्या पाल्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतिश नलावडे व शिक्षकवृंद तसेच अध्यक्ष संदीप गावणंग उपाध्यक्ष वैभव ठाकूर सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १ यांनी केले आहे. "चला, व्यसनमुक्त पिढी घडवूया; निरोगी, सुदृढ आणि संस्कारक्षम भारताच्या निर्मितीसाठी हातभार लावूया," असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशालेचे उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी दिली आहे.

























































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.