loader
Breaking News
Breaking News
Foto

केर-भेकुर्लीतील प्रस्तावित M-Sand प्रकल्पाला ग्रामस्थांचा एकमुखी विरोध

तिलारी, (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील केर-भेकुर्ली परिसरात सर्व्हे क्रमांक 9/1 मध्ये प्रस्तावित असलेल्या M-Sand प्रकल्पाविरोधात केर व भेकुर्ली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. आयोजित विशेष बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने या प्रकल्पास विरोध करण्याचा ठराव मंजूर करत गावाच्या पर्यावरण, जलस्रोत आणि शेतीच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत पर्यावरण अभ्यासक म्हणून परिचित असलेले 'रान माणूस' प्रसाद गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना M-Sand प्रकल्पामुळे पर्यावरण, नैसर्गिक जलस्रोत, जैवविविधता, शेती आणि स्थानिकांच्या पारंपरिक हक्कांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांची सविस्तर माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पत्रकार व ग्रामस्थ तेजस देसाई यांनी सांगितले की, सुरुवातीला केवळ पाच एकर क्षेत्रात प्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगितले जात असले, तरी भविष्यात त्याचा विस्तार सुमारे ७४ हेक्टर क्षेत्रापर्यंत होण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती धोक्यात येऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रेमानंद देसाई यांनी केर डोंगर आणि परिसरातील जमिनीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत, "विकासाला आमचा विरोध नाही; मात्र पर्यावरण आणि स्थानिकांच्या भवितव्यावर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांना विरोध आहे. आज आवाज उठवला नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्यालाच जबाबदार धरतील," असे मत व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

बैठकीदरम्यान अनेक ग्रामस्थांनीही आपली मते मांडत प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला. गावाच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न असल्याने सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार तेजस देसाई, प्रेमानंद देसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संतोष मौर्ये, शिवसेना (शिंदे गट)चे राजू निंबाळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस, ॲड. सोनू गवस यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्कल अधिकारी, तलाठी आणि दोडामार्ग पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनीही बैठकीस उपस्थिती लावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg