loader
Breaking News
Breaking News
Foto

जेसीआय खेड व प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबये येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ९३ लाभार्थ्यांची तपासणी

खेड - जेसीआय खेड व प्राथमिक आरोग्य केंद्र, जामगे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी आंबये येथील मराठी शाळा, पाटीलवाडी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ९३ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, कॅन्सर तपासणी, एचआयव्ही चाचणी, शुगर व रक्तदाब तपासणी, आयुष्मान भारत कार्ड सेवा, आभा (AइकA) कार्ड नोंदणी, एएनसी/पीएनसी माता आरोग्य मार्गदर्शन तसेच लाभार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. याशिवाय महावीर एजन्सीचे अक्षत जैन व शंकर पार्टे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना प्रोटीनचे डबे वाटप करण्यात आले, तसेच जेसीआय खेडच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरासाठी डॉ. नम्रता भुवड, डॉ. आदित्य चिंदे आणि डॉ. ज्ञानेश्वर मारकड यांनी वैद्यकीय सेवा दिली. तसेच जेसीआयचे माजी संचालक जेसी शंकर पार्टे, सीएचओ शुभांगी ओसवानी, आरोग्य सेवक सतीश येवले, आरोग्य सेविका शुभांगी हरावडे, आशा सेविका अस्मिता सकपाल, मनीषा निवाते, मदतनीस शिल्पा दळवी, अंगणवाडी सेविका मोरे मॅडम, मुख्याध्यापक सावंत मॅडम, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

या उपक्रमाचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर जेसी शंकर पार्टे यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमासाठी JFM अमित नमुष्टे (अध्यक्ष, जेसीआय खेड) आणि JFM मधुर पेठे (सचिव, जेसीआय खेड) व जय पद्मिनी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा, आरोग्याविषयी जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg