loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड नगरपंचायती समोरील रस्त्याची झालीय चाळण

मंडणगड(प्रतिनिधी)- मंडणगड शहरातील एसटी आगार व नगरपंचायत कार्यालयाच्या समोरील मुख्य रस्ता हा मंडणगड शहरातील सर्वाधीक वर्दळीचा म्हणून ओळखला जातो. याच रस्त्यावर खड्‌ड्यांचे असे साम्राज्य पसरले आहे की गाड्या तर राहु द्यात, पादचार्‌यांनाही चालणे कठीण झाले आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याने शिवसेना मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोवले चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी नगरपंचायतीला १५ ऑगस्ट पर्यंत हा रस्ता खड्डेमुक्त झाला नाही तर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने याच खड्‌ड्यांमधे मोठ्याप्रमाणावर प्रतिकात्मक वृक्षारोपण करून नगरपंचायतीचा निषेध करू असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. मंडणगड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मंडणगड शहरातील सर्वात मोठी वर्दळ असलेल्या एस.टी. स्टॅड आणि मंडणगड नगर पंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशा या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीची, फळांची, पानांची, खाऊंची आदी विविध प्रकारची छोटीमोठी दुकाने आहेत, तसेच रिक्षा स्टँड देखील आहे, त्यामुळे काही सामान खरेदी करण्यासाठी जसे येथे ग्राहक येत असतात तसे रिक्षेतून जाण्यासाठी प्रवासी येथे येत असतात. त्याशिवाय मंडणगड नगर पंचायतीच्याच कोंझर गावाकडे जाणारा त्याचबरोबर अडखळ आणि टाकवली या महसुली गावांकडे जाणारा तसेच तालुका मुख्यालयाकडे येण्यासाठी जसा हा मार्ग महत्वाचा आहे, तसा तो शहरातील नागरिकांना मंडणगड नगर पंचायत कार्यालयात येण्यासाठीही महत्वाचा असा एकमेव मार्ग आहे. याच मार्गावरुन सुप्रसिद्ध मंडणगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना किल्ल्‌यावर जावे लागते तर स्थानिक रहिवाशी हे नित्यनेमाने किल्ल्यावरील श्री गणपती मंदिरात देवदर्शनाला जात असतात. अशा या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मंडणगड शहरातील महत्त्वाच्या मार्गावर खड्डे पडून अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्‌ड्यांमध्ये पावसाचे गढूळ पाणी तंबूत राहत आहे. हेच गढुळ पाणी वाहनांच्या ये जा करण्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खावू ,भाजी, फळे , पाने आदी विविध थाटलेल्या उदयोग धंदयावर उडत असल्याने सतत वादाचे खटके उडत आहेत. त्यामुळे तसेच रस्त्याचे महत्व लक्षात घेऊन नगर पंचायतीने आपल्या कार्यालयासमोरील रस्त्यातील खड्डे बुजवून रस्ता वाहतूक योग्य करावा.

टाइम्स स्पेशल

१४ ऑगस्ट २०२६ पूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवून रस्ता वाहतूक योग्य केला गेला नाही तर जनहितासाठी म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरून रस्त्यातील खड्‌ड्यांमध्ये वृक्षारोपण करेल. अशाप्रकारचा निर्वानीचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवले यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg